गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांचे लक्ष्य गावातील जीवनमान सुधारणा, पायाभूत सुविधा वाढवणे तसेच शिक्षण, आरोग्य, रोजगार, स्वच्छता आणि महिला सक्षमीकरणाला चालना देणे हे असते.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६
गावात लोकसहभागाची भावना निर्माण करणे, नागरिकांना सुलभ सेवा उपलब्ध करून देणे आणि आरोग्य, शिक्षण, उपजीविका तसेच सामाजिक न्याय या क्षेत्रांत कार्य करणे.
स्वच्छ भारत अभियान
ग्रामीण स्वच्छतेची पातळी उंचावण्यासाठी आणि गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतागृहे, शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये शौचालयांची उभारणी तसेच घन आणि द्रव कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था करणे.
जलजीवन मिशन योजना
प्रत्येक गावातील घरात नळ जोडणीद्वारे स्वच्छ पाणी पोहोचवण्याचा हेतू.
शबरी आवास योजना
अनुसूचित जमातींच्या कुटुंबांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देणारी योजना.
रमाई आवास योजना
सामाजिकदृष्ट्या दुर्बल समुदायांना घरे उपलब्ध करून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी राबविली जाणारी योजना.
आयुष्यमान भारत योजना – जन आरोग्य अभियान
गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोफत आरोग्य सेवा, हॉस्पिटलिंग आणि वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणारी योजना
१५ वा वित्त आयोग (१५व्या वित्त आयोगाची सविस्तर माहिती)
गाव पातळीवर विकासासाठी केंद्र सरकारकडून निधीचे वितरण.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ग्रामस्तरावर रोजगाराची हमी देणारी महत्त्वाची योजना आहे.